गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

मायक्रोसॉफ्टतर्फे ईमेल आयडीसाठी १५ भारतीय भाषांची निवड - २२ फेब्रुवारी २०१८

मायक्रोसॉफ्टतर्फे ईमेल आयडीसाठी १५ भारतीय भाषांची निवड - २२ फेब्रुवारी २०१८

* मायक्रोसॉफ्ट ही टेकनॉलॉजी कंपनी कायम नवनवीन बाबतीत प्रगती करत आघाडीवर असते. आता कंपनीने भारतीयांसाठी आणि विशेषतः मराठीजणांसाठी एक खास गोष्ट केली आहे.

* त्यासाठी मायक्रोसॉफ्टने ईमेल आयडीसाठी १५ भारतीय भाषांची निवड केली आहे. त्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश असून येत्या काळात त्यामुळे तुमचा मेलआयडी निर्माण करायचा असेल तर मराठीसारख्या स्थानिक भाषेचाही वापर करता येणार आहे.

* आतापर्यंत आपण मेलआयडी केवळ इंग्रजीमध्ये निर्माण करू शकत होतो. पण मायक्रोसॉफ्टने उचललेल्या सकारात्मक पाऊलामुळे आता भारतीयांना आपल्या स्थानिक भाषेत मेल आयडी तयार करता करता येणार आहेत.

* यामध्ये सुरवातीच्या टप्प्यात हिंदी, बोडो, डोगरी, कोकणी, मैथिली, मराठी, नेपाळी, सिंधी, बंगाली, गुजराती, मणिपुरी, पंजाबी, तामिळ, तेलगू, आणि उर्दू या भाषांचा समावेश असेल.

* तंत्रज्ञानाच्या मदतीने संवाद जास्तीत जास्त सोपा करण्याच्या दृष्टीने ईमेल आयडी १५ भारतीय भाषांमध्ये करता येणा हे अतिशय महत्वाचे पाऊल आहे. असे कंपनीने म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.