शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

मिग-२१ स्वतंत्र उड्डाण करणारी अवनी चतुर्वेदी भारताची पहिली महिला - २३ फेब्रुवारी २०१८

मिग-२१ स्वतंत्र उड्डाण करणारी अवनी चतुर्वेदी भारताची पहिली महिला - २३ फेब्रुवारी २०१८

* भारतीय हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी [वय २४] ही लढाऊ विमानाचे स्वतंत्रपणे उड्डाण करणारी पहिली भारतीय महिला वैमानिक ठरली आहे.

* गुजरातमधील जामनगर हवाई दलाच्या तळावरून अवनी यांनी सोमवारी [मिग २१ बायसन] हे लढाऊ विमान उडवून इतिहास रचविला. या विमानाच्या उड्डाणाचा व खाली येण्याचा वेग हा जगातील सर्वाधिक असल्याची नोंद करण्यात आली.

* लढाऊ विमान स्वतंत्रपणे उडवण्याची अवनी यांची ही पहिलीच वेळी होती. त्यांनी ३० मिनिटे विमान उडविले, असे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

* भारतीय हवाई दलातील लढाऊ गटात महिलांना २०१५ मध्ये प्रथमच प्रवेश देण्यात आला. त्यानुसार २०१६ मध्ये या गटात दाखल झालेल्या तीन महिला वैमानिकांच्या तुकडीसह अवनीसह मोहना सिंग आणि भावना कांत यांचा समावेश होता.

* अवनी चतुर्वेदी या मूळच्या मध्य प्रदेशातील  रेवा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण एका छोट्याश्या शाळेत झाले.

* राजस्थानमधील वनस्थळी विद्यापीठातून त्यांनी तंत्रज्ञान विषयात पदवी मिळविली आहे. या काळात त्यांनी फ्लाईंग क्लबमध्ये प्रवेश घेतला आणि भारतीय हवाई दलाची परीक्षा उत्तीर्ण झाली.

* पुढील वर्षी कर्नाटकमधील बिदरमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या सुखोई व तेजस या प्रकराची लढाऊ विमाने उडवू शकतील.

* सध्या जगात अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटन आणि पाकिस्तान या देशांमध्येच महिला लढाऊ विमानाच्या वैमानिक बनू शकतात. त्यात आता भारताचा समावेश झाला आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.