रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

विश्वचषक जिम्नॅस्टिकमध्ये अरुणा रेड्डीला ब्राँझपदक - २५ फेब्रुवारी २०१८

विश्वचषक जिम्नॅस्टिकमध्ये अरुणा रेड्डीला ब्राँझपदक - २५ फेब्रुवारी २०१८

* मेलबर्न येथे सुरु असलेल्या जिम्नॅस्टिक विश्वकरंडक स्पर्धेत वॉल्ट प्रकारात भारताच्या अरुणा बुद्दा रेड्डी ब्राँझपदक जिंकून इतिहास घडविला. भारताची आणखी एक जिम्नॅस्ट प्रणिती नायकला सहावे स्थान मिळाले.

* अरुणाने दोन वॉल्टमध्ये सरासरी १३.६४९ गुणांची कमाई केली. तर सहावी आलेल्या प्रणितीचे १३.४१६ गुण झाले. या प्रकारात स्लोव्होनियाच्या तासा केल्सीएफने १३.८ गुणांसह सुवर्ण, तर ऑस्ट्रेलियाच्या एमिली विथहेड १३.६९९ गुणांसह रौप्यपदक जिंकले.

* ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे होत असलेल्या या विश्वकरंडक जिम्नॅस्टिक १६ देश सहभागी झाले आहेत. गेले दोन दिवस पात्रता स्पर्धा झाल्या आणि आज व उद्या अंतिम सामने होत आहेत.

* अरुणा ही मूळची हैदराबादची आहे. आठव्या वर्षांपासून जिम्नॅस्टिकला सुरुवात, पाचव्या वर्षांपासून कराटे खेळायची परंतु तिची लवचिकता पाहून कराटे प्रशिक्षणाची जिम्नॅस्टिक करण्याचा सल्ला दिला.

* २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पात्रता मिळविली. परंतु वय १४ वर्षापेक्षा कमी असल्यामुळे तिला खेळता आले नव्हते. जिम्नॅस्टिक घडवण्यासाठी वडील नारायण रेड्डी यांनी घरही विकले होते.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.