शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता 'ई-नाम' योजना - २३ फेब्रुवारी २०१८

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता 'ई-नाम' योजना - २३ फेब्रुवारी २०१८

* राज्यातील बाजार समित्यांमध्ये 'कॅशलेस' व्यवहारांना चालना देण्यासाठी 'ईनाम' योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत बाजारांच्या आवारातील शेतीमालाचा ई-लिलाव करण्यात येणार आहे.

* पहिल्या टप्प्यात ३० बाजार समित्यामध्ये ही योजना सुरु केली जात असून, दुसऱ्या टप्प्यात ती आणखी ३० बाजार समित्यात चालू करण्यात येणार आहेत.

* बाजार समित्यांमध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार [ई-नाम] या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे.

* महाराष्ट्र हे या योजनेची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य ठरले पाहिजे. त्यासाठी सर्व बाजार समित्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी तातडी करावी.

* यासाठी बाजार समित्यांना प्रोत्साहनपर बक्षीस द्यावे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'ईऑक्शन' ई पेमेंट करणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार समितीस द्याव्या लागणाऱ्या फीमध्ये सवलत देण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.