बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

इंडियन ओपन स्पर्धेत पी व्ही सिंधूला उपविजेतेपद - ६ फेब्रुवारी २०१८

इंडियन ओपन स्पर्धेत पी व्ही सिंधूला उपविजेतेपद - ६ फेब्रुवारी २०१८

* भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभव झाल्यामुळे तिला उपविजतेपदावर समाधान मानावे लागले.

* गेल्या वर्षी ग्लासगो येथे पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप तसेच तसेच दुबईत पार पडलेल्या सुपरसीरिजच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.

* इंडिया ओपनच्या उत्कंठापूर्वक अंतिम सामन्यात अमेरिकन खेळाडू झांग बेनवेई तिचा २१-१८, ११-२१, २२-२० असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

*  बेनवेईचे हे पहिलेच सुपर सिरीज विजेतेपद ठरले. याआधी तिने २०१६ मध्ये फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली होती.

* पुरुष गटात चीनच्या शेईयुकी याला विजेतेपद मिळाले. त्याने तृतीय मानांकित चोयू तिएनचेन याचा २१-१८, २१-१४  असा पराभव केला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.