गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

'नॅसकॉम' च्या अध्यक्षपदी देवयानी घोष यांची निवड - २३ फेब्रुवारी २०१८

'नॅसकॉम' च्या अध्यक्षपदी देवयानी घोष यांची निवड - २३ फेब्रुवारी २०१८

* माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची [आयटी] शिखर संघटना असलेल्या नॅसकॉम च्या अध्यक्षपदी इंटेल कॉर्पोरेशनच्या दक्षिण आशिया विभागाच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या देवयानी घोष यांची निवड झाली आहे.

* येत्या एप्रिलमध्ये घोष नॅसकॉमची सूत्रे स्वीकारतील. नॅसकॉमच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लिंगभेद नष्ट करून महिलांना समान स्थान देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

* घोष यांनी तब्बल २० वर्षे 'इंटेल कॉर्पोरेशन' मध्ये विविध पदावर काम केले आहे. त्यांनी अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. जागतिक बाजारपेठेतील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी नॅसकॉमची भूमिका त्यांच्या कार्यकाळात निर्णायक ठरणार आहे.

* पुरुष आणि महिला यांच्यातील बुद्धिमत्तेला पडताळणे आवश्यक आहे. अनेक माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवठादारांना महिला कर्मचाऱ्याना विवाहानंतर सेवेत कायम ठेवताना अडचणींना सामना करावा लागतो.

* महिला कर्मचाऱ्यांना विवाहानंतर सेवेत कायम ठेवताना अडचणींना सामना करावा लागतो. महिला कर्मचाऱ्यांना विवाहानंतर सेवेत कायम ठेवताना अडचणींना सामना करावा लागतो.

* महिला कर्मचाऱ्यांची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे घोष यांनी म्हटले आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात सुमारे ४० लाख कुशल मनुष्यबळ असून, त्यापैकी एक तृतीयांश महिला आहेत.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.