शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

उमेदवारांना निवडणुकीचा अर्ज भरताना आता उत्पन्न जाहीर करावे लागणार - १७ फेब्रुवारी २०१८

उमेदवारांना निवडणुकीचा अर्ज भरताना आता उत्पन्न जाहीर करावे लागणार - १७ फेब्रुवारी २०१८

* आजवर निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचे उत्पन्न जाहीर करावे लागत होते. मात्र आता तेवढ्याने भागणार नाही. उमेदवारांना त्या उत्पन्नाच्या स्रोतही जाहीर करावा लागेल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

* अशा स्वरूपाची मागणी करणारी याचिका लोक प्रहरी या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने तिचे सरचिटणीस एस एन शुक्ला यांनी दाखल केली होती. त्यावर आता उमेदवारांना उत्पन्नाचा स्रोतही जाहीर करणे बंधनकारक ठरणार आहे.

* नव्या उमेदवारी अर्जामध्ये त्यासाठी वेगळा रकाना असेल. जाहीर उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या आमदार, खासदारांवर काय कारवाई केली, याची विचारणा न्यायालयाने पूर्वी केली होती.

* त्याला उत्तर म्हणून या सुनावणीदरम्यान सोमवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या वतीने न्यायालयांत प्रतिज्ञापत्रामध्ये सकृदर्शनी अनियमितता असल्याचे आढळले.

* या प्रकरणात द असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म एडीआर या संस्थेनेही त्यांचे म्हणणे न्यायालयात मांडले. ही संस्था निवडणूक सुधारणांसाठी काम करते.

* गेल्या निवडणुकीपासून आतापर्यंतच्या काळात लोकसभेच्या चार खासदारांची मालमत्ता १२ पटींनी वाढली. तर अन्य २२ जणांची मालमत्ता जाहीर केली होती. त्यापेक्षा पाचपट वाढली याकडे संस्थेने न्यायालयाकडे लक्ष वेधले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.