बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतील २०१८ मधील गुंतवणूक - २१ फेब्रुवारी २०१८

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतील २०१८ मधील गुंतवणूक - २१ फेब्रुवारी २०१८

* थेट परकीय गुंतवणुकीचे महत्वाचे प्रकल्प - कॅरियर मीडिया इंडिया प्रा लिमिटेड ३०० कोटी, इमर्सन प्रोसेस मॅनेजमेंट ८१५ कोटी, आयएलजीआयएन ग्लोबल इंडिया ७५० कोटी, ओव्हन्स कॉर्निंग इंडिया १०५० कोटी, पेरी विर्क ७२५ कोटी.

* अविकसित भागातील प्रकल्प - लॉइड मेटल अँड एनर्जी गडचिरोली ७०० कोटी, जिनस पेपर अँड बोर्ड, नंदुरबार ७०० कोटी, टेक्नोकार्ट इंडस्ट्री अमरावती १८३ कोटी, इंडिया ऍग्रो अनाज लिमिटेड नांदेड २०० कोटी, शिरूर ऍग्रो लिमिटेड हिंगोली १२५ कोटी.

* मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील महत्वाचे प्रकल्प - कॉयर क्लस्टर सिंधुदुर्ग ७.५६ कोटी,  मेगा लेदर क्लस्टर रायगड ५०० कोटी, चित्रावली फाउंडेशन आर्ट अँड क्राफ्ट क्लस्टर पालघर १ कोटी. इलेक्ट्रॉनिक क्लस्टर नागपूर ५ कोटी. गोल्ड ज्वेलरी क्लस्टर अहमदनगर.

* रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आज मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत विविध कंपन्यांशी करार केले. त्यात रिलायन्स कंपनीचा एकट्याचा वाटा ६० हजार कोटी रुपयाचा असेल.

* डिजिटल क्रांतीचे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीनंतरचे दुसरे केंद्र म्हणून मुंबईची ओळख यानिमित्ताने निर्माण केली जाणार आहे. यालाच चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र असेल.

* पायाभूत विकास प्रकल्पामध्ये शासनाची गुंतवणूक - वाहतूक आणि बंदरे ४८ प्रकल्प ५९ हजार ३२ कोटीची गुंतवणूक, सार्वजनिक बांधकाम ५ प्रकल्प १ लाख २१ हजार कोटीची गुंतवणूक.

* मुंबई महापालिका १८ प्रकल्प ५४ हजार ४३३ कोटीची गुंतवणूक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ३० प्रकल्प, एक लाख ३२ हजार ७६१ कोटी. नगर विकास ३ प्रकल्प २३ हजार १४३ कोटी.

* या परिषदेत मराठवाड्यासाठी विकास म्हणून लातूर येथे मेट्रो रेल्वे डब्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पहिल्या टप्प्यासाठी ६०० कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत.

* लातूरच्या या प्रकल्पात जर्मन तंत्रज्ञानाचे तंत्रज्ञान असेल. लिंक हॉफमन बॉश एलएचबी या डबे तयार करणाऱ्या जगातील अव्वल तंत्रज्ञानाचे हे डबे असतील. या मेट्रो रेल्वे डब्याना जगभरात मागणी असेल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.