मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

देशातील पहिला ज्वेलरी पार्क होणार महाराष्ट्रात - २० फेब्रुवारी २०१८

देशातील पहिला ज्वेलरी पार्क होणार महाराष्ट्रात - २० फेब्रुवारी २०१८

* देशातील पहिल्या ज्वेलरी पार्कची उभारणी लवकरच मुंबईनजीक करण्यात येणार आहे. सन २०२२ पर्यंत जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील निर्यात ६० अब्ज डॉलर इतकी होईल. असा विश्वास जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पर्टचे प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष पी पंड्या यांनी आज व्यक्त केला.

* देशाची अर्थव्यवस्था ३ लाख कोटी अमेरिकन डॉलरची करण्यामध्ये निर्यात क्षेत्राची मोठी भूमिका असेल. आणि निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे केंद्राचे धोरण आहे.

* हिरे घडविण्यासाठी आधी जगातील बरेच देश ते बव्हंशी महाराष्ट्रात पाठवायचे पण काही प्रशासकीय अडथळ्यामुळे नंतर ते गुजरात आणि दक्षिण आशियात जाऊ लागले.

* मात्र आता महाराष्ट्र सरकारने हिरे धोरण आणले असून त्याद्वारे अनेक सवलती व सुविधा दिल्या असल्याने पुन्हा महाराष्ट्राचे या क्षेत्रातील महत्व वाढेल. किमान देशाची निर्यात ४० टक्क्यांनी वाढवण्याची गरज आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.