बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

केंद्राकडून राज्याचे महत्वाचे ११ प्रकल्पाला मंजुरी -१४ फेब्रुवारी २०१८

केंद्राकडून राज्याचे महत्वाचे ११ प्रकल्पाला मंजुरी -१४ फेब्रुवारी २०१८

* नरेंद्र मोदी सरकारने ३ वर्षात महाराष्ट्रातील ११ महत्वाच्या प्रकल्पाना मंजुरी दिली आहे. केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने वर्षानुवर्षे हिरवा हिरवा कंदील न दिल्याने या प्रकल्पाना प्रत्येकी ५ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

* रस्तेबांधणी, रेल्वे, पोलाद, ऊर्जा, कोळसा, नदीखोरे, पायाभूत सुविधा या क्षेत्राशी संबंधित ६८ महत्वाच्या प्रकल्पाना गेल्या १० वर्षांपासून केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने मंजुरीच दिलेली नव्हती.

* त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ११ प्रकल्प महाराष्ट्रातील होते. त्या खालोखाल गुजरात [८], आंध्र प्रदेश [७], तेलंगणा [५], व अन्य राज्यातील प्रकल्पांचा समावेश होतो.

* महाराष्ट्रातील मंजुर केलेले प्रकल्प

* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील येडशी ते औरंगाबाद दुपदरी रस्त्याचे चौपदरी करणे.
* जेएनपीटी बंदरातील रेल्वेमार्ग दुहेरी करणे.
* एमएमआरडीएच्या मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकला सीआरझेड परवानगी.
* डीएमआरद्वारे औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन औद्योगिक वसाहत प्रकल्प.
* मुंबई महमद अली रोडवर बुऱ्हाणी उन्नयन प्रकल्पाचा पुनर्विकास.
* नवीन बांधकाम प्रकल्प व औद्योगिक वसाहतीचा विकास.
* ऑटोलाईन इंडस्ट्रियल पार्कतर्फे उभारण्यात येणारे विशेष टाऊनशीप प्रकल्प.
* शिरपूर येथील उपसा जलसिंचन प्रकल्प व नदीवरील जलविद्युत प्रकल्प.
* जेएसडब्लू स्टीलच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाची क्षमता ५ एमटीपीवरून १० एमटीपीए वाढविणे, तसेच ऊर्जा प्रकल्पाची क्षमता ३०० मेगावॅटवरून ६०० मेगावॅट करणे.
* उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेडतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा गावात उभारायच्या पोलाद प्रकल्पाची क्षमता ३ एमटीपीपर्यंत वाढविणे.
* सन फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या पोलाद प्रकल्पाचा विस्तार करणे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.