मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन - २८ फेब्रुवारी २०१८

कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन - २८ फेब्रुवारी २०१८

* कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. कांची कामकोटी पिठाचे ते ६९ शंकराचार्य होते

* शंकराचार्य जयेंद्र सरस्वती गेल्या काही महिन्यापासून आजारी होते. गेल्या महिन्यात त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने चेन्नईतील श्री रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आला.

* तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले. जयेंद्र सरस्वती यांचा जन्म १८ जुलै १९३५ मध्ये झाला होता.

* कांचीपुरम पिठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. कांचीपुरम वरदराज पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकरामन यांच्या हत्या प्रकरणात जयेंद्र सरस्वती आरोपी होते. मात्र न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.