सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

रॉटरडॅम टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररला विजेतेपद - १९ फेब्रुवारी २०१८

रॉटरडॅम टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररला विजेतेपद - १९ फेब्रुवारी २०१८

* स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने वयाच्या ३६ व्या वर्षी जागतिक  अव्वल  मानांकन आणि विजेतेपद अशी दुहेरी कामगिरी रॉटरडॅम टेनिस स्पर्धेत करून दाखविली. अंतिम फेरीच्या लढतीत त्याने ग्रिगॉर दिमीत्रावचा ६-२, ६-२ असा पराभव केला.

* या विजेतेपदानंतर आता ग्रँडस्लॅम स्पर्धेचा विजेता असणाऱ्या फेडररच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकनावर सोमवारी शिक्कामोर्तब होईल.

* फेडररचे कारकिर्दीतील हे ९७ वे खुले विजेतेपद ठरले. आता त्यापुढे फक्त जिमी कॉर्नर्स असून, त्याने १०९ विजेतेपद मिळविली आहे.

* फेडरर यापूर्वी फेब्रुवारी २०४ मध्ये पहिल्यांदा जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकनावर आला होता. पण ऑक्टोबर २०१२ पासून तो या क्रमांकापासून दूर होता.

* जानेवारी २०१७ मध्ये तर तो १७ व्या स्थानापर्यंत घसरला होता. दुखापतीवर मात करण्यासाठी सहा महिने टेनिसपासून दूर राहिल्यावर फेडररने जोरदार मुसंडी मारली.

* दुखापतीनंतर पुनरागमन केल्यापासून त्याने गेल्या वर्षीच्या विम्बल्डन विजेतेपदासह एकूण ८ विजेतेपदे मिळविली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.