मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

ख्रिस्तियन कोलमनचा इनडोअर स्पर्धेत ६० मीटरचा शर्यतीत जागतिक विक्रम - २० फेब्रुवारी २०१८

ख्रिस्तियन कोलमनचा इनडोअर स्पर्धेत ६० मीटरचा शर्यतीत जागतिक विक्रम - २० फेब्रुवारी २०१८

* वेगाचा बादशहा उसेन बोल्ट याच्या निवृत्तीवर ज्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशा अमेरिकेच्या ख्रिस्तियन कोलमन याने अमेरिकेच्या इनडोअर राष्ट्रीय स्पर्धेत ६० मीटर धावण्याच्या शर्यतीत थेट विश्वविक्रमाला गवसणी घातली.

* वेगाशी स्पर्धा करणारा नवा धावपटू म्हणून कोलमन कडे बघितले जाते. त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना रविवारी राष्ट्रीय इनडोअर स्पर्धेत ६० मीटर शर्यत ६.३४ सेकंद अशा विश्वविक्रमी वेळेत जिंकली.

* २१ वर्षीय कोलमनने भन्नाट सुरुवात केल्यावर रोनी बेकरला ६.४० सेकंद ०.१४९ सेकंदाच्या फरकाने मागे टाकले आहे. त्याने मॉरिस ग्रीनच्या विक्रम शतांश ५ सेकंदाने मोडीत काढला. ग्रीनने १९९८ मध्ये माद्रीत येथे ६. ३९ सेकंद अशी वेळ दिली होती.

* कोलमनने २०१७ मध्ये १०० मीटर शर्यतीत ९.८२ सेकंद वेळ दिली होती. पण जागतिक स्पर्धेत त्याला जस्टिन गॅटलिनने मागे टाकले. पण कोलमनने बोल्टला मागे टाकत रौप्यपदक पटकाविले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.