रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

काही नवीन विशेष चालू घडामोडी - ४ फेब्रुवारी २०१८

काही नवीन विशेष चालू घडामोडी - ४ फेब्रुवारी २०१८

* औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बाळू आनंद चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या बीएचयू कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

* मालदीव येथील सर्वोच्च न्यायालयाने तेथे लोकशाही पद्धतीने बनलेले पहिले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्याविरोधातील शिक्षेला स्थगिती देत त्यांच्यावर नव्याने दहशतवादविरोधी खटला चालविण्याचा निर्णय दिला.

* भारताची अव्वल महिला बॉक्सिंग खेळाडू एम सी मेरी कॉम हिने इंडियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

* स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी 'आयएनएस करंज' चे ३१ जानेवारी रोजी मुंबईच्या माझगाव डॉक येथून जलावतरण करण्यात आले.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी नवीन राजकीय वाटचालीसाठी 'राष्ट्रमंच' ची स्थापना केली.

* पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया देवी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी २६ जानेवारी रोजी निधन झाले.

* भारताचा रोहन बोपन्ना आणि हंगेरीची टिमीया बाबोस यांना ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

* सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत गेल्यावर्षी पहिल्या स्थानी असलेल्या भारताची यावर्षी तिसऱ्या स्थानी घसरण झाली.

* देशाच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा असलेले कृषीशास्त्रज्ञ गुरुचरण सिंग कालकट यांचे २७ जानेवारी रोजी निधन झाले.

* डोकलाम प्रश्न सोडण्यात महत्वाची भूमिका बजावणारे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विजय गोखले यांनी परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार २९ जानेवारी रोजी स्वीकारला.

* इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या तायझ्यु यिंगने पराभूत केले.

* परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकाचे प्रकाशन मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते नवी दिल्लीत झाले.

* केंद्र सरकारने वर्ष २००५ मध्ये हिंदू वारसाहक्क कायद्यात संशोधन करत वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना बरोबरचा हक्क देण्याचे व्यवस्था केली होती.

* IPS अधिकारी सुदीप लखटकीया यांनी 'राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG)' च्या महानिदेशक पदाचा कारभार आपल्या हातात घेतला आहे.

* जागतिक पोलाद संघ [WSA] च्या अहवालानुसार चीन २०१७ साली ८३.१७ कोटी टन [५.७% वृद्धी] पोलाद उत्पादनासह जगातला सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनला आहे.

* नीलम कपूर यांची भारतीय खेळ प्राधिकरण [SAI] च्या महानिदेशकपदी निवड करण्यात आली आहे.

* इस्रो आपल्या महत्वाकांक्षी चंद्रयान-२ योजनेच्या अखेरच्या टप्प्यात आहे. २०१८ मध्ये हे चंद्रयान चंद्रावर पाऊल ठेवणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.