शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

कोणत्याही रकमेचे नाणे स्विकारा आरबीआयचे बँकांना निर्देश - १७ फेब्रुवारी २०१८

कोणत्याही रकमेचे नाणे स्विकारा आरबीआयचे बँकांना निर्देश - १७ फेब्रुवारी २०१८

* बँकेची कोणतीही शाखा कमी किमतीचे ५० पैशाचे नाणे किंवा नोटा घेण्यास नाकारू शकत नाही. कुठल्याही रकमेचे नाणे ग्राहकाकडून घेण्यास बँका नकार देऊ शकत नाही.

* कुठल्याही रकमेचे नाणे ग्राहकाकडून घेण्यास बँका नकार देऊ शकत नाही. जर नकार दिल्याचे आढळून आल्यास संबंधित बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाईल. असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांना देण्यात आला.

* विविध बँकांच्या शाखांची अल्प किमतीची नाणी किंवा नोटा नाकारण्याच्या तक्रारी येत असल्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

* नाणी एक्सेंज करण्यास, डिपॉझिट करण्यास नकार दिल्यास दुकानदार व छोटे व्यापारी हे ग्राहकाकडून नाणी घेणार नाहीत. यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होईल.

* बँकांनी कोणत्याही किमतीची नाणी बदलून देणे व डिपॉझिट करायचे असल्यास ती करून घ्यावीत तसे निर्देश सर्व बँकांनी त्वरित आपापल्या शाखांना द्यावेत.

* ५० पैसे, एक व दोन रुपयांची नाणी वजनावर घ्यावीत, असा सल्लाही आरबीआयने दिला आहे. दुकानदार व छोटे व्यापारी यांनीही अशी नाणी स्वीकारली जेणेकरून ग्राहकांना चांगली सेवा मिळेल. ज्यांनी घेण्यास नकार दिला त्यांच्या विरोधात ग्राहक तक्रार करू शकतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.