मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

रतन टाटा यांना महाउद्योगरत्न पुरस्कार जाहीर - २० फेबुवारी २०१८

रतन टाटा यांना महाउद्योगरत्न पुरस्कार जाहीर - २० फेबुवारी २०१८

* टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व असलेल्या रतन टाटा यांना औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल 'महाउद्योगरत्न' या राज्यांच्या सर्वोच्च उद्योग पुरस्काराने गौरविण्यात आले.

* तर रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांना यावेळी महाउद्योगश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईत सुरु असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्रात गुंतवणूक परिषदेत सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

* महाराष्ट्राबद्दल आपल्याला नितांत आदर असल्याची भावना रतन टाटा यांनी या वेळी व्यक्त केली. निवृत्तीनंतर समाजाला आपला विसर पडतो, मात्र महाराष्ट्र सरकारने माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल आभारी आहे.

* यावेळी वस्त्रोद्योगातून राज्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना महाउद्योगश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

* रेमंड समूह १९२५ मध्ये ठाण्यात सुरु झाला. आज राज्यभर त्याचा विस्तार आहे. त्यासाठी सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल सिंघानिया यांनी आभार मानले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.