सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

भारतातील ७ हजार अब्जाधीश लोकांचे देशांतर - ५ फेब्रुवारी २०१८

भारतातील ७ हजार अब्जाधीश लोकांचे देशांतर - ५ फेब्रुवारी  २०१८

* भारतात श्रीमंतवर्गाची संख्या वाढत असल्याचे दिसत असले तरी धनवान लोकांचे देशाबाहेर स्थलांतर करण्याचे प्रमाण मोठे असल्याचे आढळून आले आहे.

* गेल्या वर्षी भारतातील अतिश्रीमंत गटातील ७ हजार जणांनी देशांतर केले आहे. श्रीमंतांनी देश सोडण्याच्या संख्येत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे.

* न्यू वर्ल्ड वेल्थ च्या अहवालात २०१७ मध्ये भारतातील ७ हजार कोट्यधिशानी परदेशात बस्तान बसविले. २०१६ मध्ये ही संख्या ६ हजार तर २०१५ मध्ये ४ हजार श्रीमंतांनी देशाटन केले.

* जागतिक पातळीवर २०१७ मध्ये चीनमधील १०,००० अतिश्रीमंतानी अन्य देशात घरोबा केल्याचे या अहवालात म्हटले आहे. अन्य देशांपैकी तुर्कस्थानमध्ये ६ हजार, ब्रिटन व फ्रांसमध्ये ४ हजार, रशियात ३ हजार, अतिश्रीमंत व्यक्ती परदेशात स्थलांतर झाले.

* स्थलांतराच्या कलानुसार भारतातील सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या व्यक्तीची पसंती अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, व न्यूझीलँड चीनमधील श्रीमंत व्यक्ती अमेरिका आणि कॅनडा असे जास्त प्रमाणात स्थायिक होतात.

* देशात ३ लाख ३० हजार ४०० अतिश्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची वैयक्तिक मालमत्ता १० लाख डॉलर आहे. या गटात जगात भारताचा ९ वा क्रमांक आहे.

* देशात २० हजार ७३९ कोट्यधीश आहेत. भारतात अब्जाधीशांची संख्या ११६ असून अमेरिका व चीननंतर भारत यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.