बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८

भारतीय अर्थव्यवस्था २०१८ मध्ये ७.६% दराने वाढणार - २८ फेब्रुवारी २०१८

भारतीय अर्थव्यवस्था २०१८ मध्ये ७.६% दराने वाढणार - २८ फेब्रुवारी २०१८

* भारताची अर्थव्यवस्था २०१८ मध्ये ७.६ टक्के दराने वाढेल असा अंदाज मूडीज या आंतरराष्ट्रीय पतनिर्धारण संस्थेने व्यक्त केला आहे.

* नोटबंदी आणि जीएसटी या दोन गोष्टीमुळे बसलेल्या धक्क्यातून भारतीय अर्थव्यवस्था सावरली असल्याचे व स्थिती सुधारत असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

* त्यामुळे नोटबंदी व जीएसटीचा फटका बसूनही अर्थव्यवस्था आधीच्या अंदाजाप्रमाणे यावर्षी ७.६ टक्के दराने वाढेल असा विश्वास मूडीजने व्यक्त केला आहे.

* भारतासारख्या विकसनशील देशामध्ये विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करताना आंतरराष्ट्रीय पतनिर्धारण संस्थांच्या रेटिंग्जचा व अंदाजाला महत्व देत असल्यामुळे या अहवालाला महत्व आहे.

* नोटबंदीमुळे विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळ बसली होती. मात्र बजेटमध्ये ग्रामीण भारतासाठी चांगल्या तरतुदी असून त्याचा अपेक्षित परिणाम दिसेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था रुळावर येईल असे मूडीजने सांगितले.

* केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. ज्यामुळे जवळपास १५ लाख कोटी रुपयाचे चलन हद्दपार झाले.

* या सगळ्यापासून भारतीय अर्थव्यवस्था सावरत असल्याचे मूडीजने म्हटले आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दल आधी व्यक्त केलेला अंदाज कायम ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

* मूडीजच्या अंदाजानुसार २०१८ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांनी तर २०१९ मध्ये ७.५ टक्क्यांनी वाढेल.

* भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये व यंत्रणेमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगत १३ वर्षांमध्ये प्रथमच नोव्हेंबर २०१७ मध्ये मूडीजने भारताच्या रेटिंग्सने वाढ केली होती.

* अर्थव्यवस्थेत करण्यात येत असलेल्या सुधारणांमुळे देशाच्या कर्जाची स्थिती आवाक्यात राहील असं मत व्यक्त करण्यात आलं आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.