रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०१७ वैशिट्ये - १८ फेब्रुवारी २०१८

इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०१७ वैशिट्ये - १८ फेब्रुवारी २०१८

* इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR) २०१७ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून अहवालानुसार महाराष्ट्रातील वनसंपदेत घट झाल्याचे म्हटले आहे.

* पर्यावरणाचे वनसंपत्तीचे संरक्षण व लोकाभिमुख संवर्धन करणाऱ्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी केल्यास राज्यासह आपला देशही स्वित्झर्लंड होऊ शकतो. त्यासाठी जंगलातील स्थानिकांनी विश्वासात घेतले पाहिजे.

* साधारण भारताचे वृक्षावरण झपाट्याने घटत आहे. असे दाखविणारा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

* भारतीय जंगलाची स्थिती

* भारतीय वनक्षेत्रात वाढ झालेली राज्ये - आंध्रप्रदेश [२,१४१] चौकिमी, कर्नाटक १,१०१ चौकिमी, केरळ १,०४३ चौकिमी, ओडिशा ८८५ चौकिमी, तेलंगणा ५६५ चौकिमी. ''

* सर्वाधिक वनक्षेत्र असलेली देशातील राज्ये - मध्यप्रदेश ७७,४१४, अरुणाचल प्रदेश ६६,९६४ चौकिमी, छत्तीसगढ ५५,५४७ चौकिमी, ओडिशा ५१,३४५ चौकिमी, महाराष्ट्र ५०,६८२ चौकिमी.

* क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वने - लक्षद्वीप ९०, मिझोराम ८६, अंदमान निकोबार ८१. एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के भूभागावर वन असलेली राज्ये १५ आहेत.

* सर्वात कमी वनक्षेत्राची राज्ये - हरियाणा १,५८८ चौकिमी, पंजाब १,८३७ चौकिमी, गोवा २,२२९ चौकिमी, सिक्कीम ३,३४४ चौकिमी, बिहार ७,२९९ चौकिमी.

* महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्राची जिल्हे - लातूर ०.१७ चौकिमी, सोलापूर ०.३२ चौकिमी, जालना ०. ४९, उस्मानाबाद ०.६२ चौकिमी, परभणी ०.७७ चौकिमी.

* भारतात वनांखाली असलेले एकूण क्षेत्रफळ २४.४% एवढे असून भारताचा जगात १० वा क्रमांक लागतो.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.