शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

केंद्राची आरोग्यासाठी 'मोदीकेअर' योजना - ३ फेब्रुवारी २०१७

केंद्राची आरोग्यासाठी 'मोदीकेअर' योजना - ३ फेब्रुवारी२०१७

* देशातील १० कोटी कुटुंबातील ५० कोटी लोकांना आरोग्याचे विमाकवच देण्यासाठी केंद्र सरकारला १२ हजार कोटी रुपये खर्च करणार असले, तरी प्रत्येक कुटुंबामागे सरकारला केवळ १,००० ते १,२०० रुपयाचा खर्च येणार आहे.

* अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या योजनेला 'मोदीकेअर' म्हणून ओळखले जात असून, १५ ऑगस्टला स्वतंत्र दिनाच्या मुहूर्तावर अथवा २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर ही योजना सुरु होणार आहे.

* केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की या योजनेचा ६०% खर्च केंद्र सरकार, तर ४०% खर्च राज्य सरकार करील. शिक्षण व आरोग्य उपकर १ टक्क्याने वाढविण्यात आला असून, त्यातून मिळणारे ११ हजार कोटी रुपये या योजनेसाठी वापरले जातील.

* नीती आयोगाचे सल्लागार आलोक कुमार यांनी सांगितले की, पहिल्या वर्षी ५० % लोकांना या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक कुटुंबाला ५ लाखाचे विम्याचे कवच मिळेल.

* सरकारला प्रतिकुटुंब हप्ता १००० ते १,२०० रुपयांपर्यंत भरावा लागेल. लाभधारकांची निवड २०११ च्या सामाजिक-आर्थिक जात जंगणनेनुसार केली जाईल.

* केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सांगितले की, कुटुंबाच्या आकारावर कोणतीही मर्यादा नसेल. योजनेचा पैसा सरकारी व्यवस्थेतच राहावा यासाठी आंध्रप्रदेशातील आरोग्यश्री योजनेसारखे मॉडेल राज्यांनी निवडावे. असे आम्हाला वाटते.

* २४ राज्यांच्या स्वतःच्या आरोग्य संरक्षण योजना नव्या योजनेत विलीन होतील. देशभर केंद्राचीच आरोग्य योजना सुरु होईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.