रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

विशेष लेख - (५ जी नेटवर्कची स्थिती) - ११ फेब्रुवारी २०१८

विशेष लेख - (५ जी नेटवर्कची स्थिती) - ११ फेब्रुवारी २०१८

* स्मार्टफोनमुळे इंटरनेट विश्वाच्या व्याख्याच बदलून गेल्या. २ जी पासून सुरवात झालेलं मोबाईल इंटरनेट हळूहळू ३ जी आणि आता ४ जी पर्यंत येऊन पोहोचलं आहे. त्यामुळे आता आपली वाटचाल ५ जी च्या दिशेने सुरु झाली आहे.

* सर्वात वेगवान - ५ जी हे फक्त वेगवान आहे एवढच नाही. तर याची तुलना ब्रॉडब्रँड कनेक्शनशी केली जात आहे. अमेरिकेत ५ जीचा स्पीड हा एलटीई नेटवर्कच्या सरासरी स्पीडपेक्षा २५७ पटीने अधिक आहे. जे स्नॅपड्रॅगन X५० ला सपोर्ट करत.

* आता आपण फक्त ५G फर्स्ट जनरेशनचा विचार करतो आहोत. भविष्यात याचा वेग आणखी जास्त असेल. ५जी म्हणजे फक्त स्पीड नाही. या नेटवर्कची क्षमता प्रचंड आहे.

* ४जी पेक्षा ५ जी मध्ये अत्यंत कमी वेळात कनेक्शन मिळू शकत. त्यामुळे डिव्हासेस जास्त जलद संवाद साधण्यास सक्षम असतील.

* ५ जी हे फक्त स्मार्टफोनसाठी असेल असं नाही. तर तुम्ही याचा उपयोग व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट, कॉम्प्युटर, स्मार्ट होम डिव्हाइसेस यासाठीही वापरू शकता.

* ५ जी हे प्रचंड वेगवान व बहुपयोगी असल्याने त्यासाठी ग्राहकांना तसे पैसेही मोजावे लागणार आहेत. सुरवातीला अनलिमिटेड ५ जी डेटासाठी सध्या २० ते ३० डॉलर मोजावे लागू शकतात.

* पण याचा अर्थ असा नाही की याच्या  किमती कमी होणार नाहीत. क्वॉलक्वॉमसारख्या कंपन्या आशावादी आहेत की, ५ जी सुरु झाल्यानंतर नवी उपकरण येतील आणि त्यामुळे या डेटाच्या किमती कमी होतील. पण यासाठी नेमका किती वेळ लागेल. हे मात्र सांगता येणार नाही.

* आपल्याला ५ जी पर्यंत जाण्यासाठी एक मोठा टप्पा पार करायचा आहे. कारण की, ४ जी अद्याप व्यापक आहे. पण २०२० पर्यंत ५ जी आपल्या ग्राहकापर्यंत पूर्णपणे पोहोचलेलं असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.