रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

एमपीएससी परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी - २५ फेब्रुवारी २०१८

एमपीएससी परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी - २५ फेब्रुवारी २०१८

* परीक्षेला तोतया बसवून प्रशासनात उच्च पदाच्या जागा अनेक अधिकाऱ्यांनी पटकावल्याचे समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने [एमपीएससी] या गैरप्रकारांना रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे.

* आयोगाच्या परीक्षांसाठी यापुढे बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध शासकीय यंदाच्या भरतीसाठी परीक्षांच्या घेण्यात येतात.

* मात्र या परीक्षा न देता आपल्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला बसवून अगदी [अ] श्रेणीच्या पदावर विराजमान झालेले अधिकारी प्रशासनात अद्यापही कार्यरत आहेत.

* राज्याच्या प्रशासनात जवळपास पन्नास अधिकाऱ्यांनी तोतयाच्या जीवावर पदे मिळवल्याचे तपासात समोरही आले आहेत.

* सातत्याने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तोतयाना पकडण्यात आले. या परीक्षार्थ्यांची ही साखळी बायोमेट्रिक हजेरी पद्धतीने परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी काही परीक्षांसाठी मोइबल जॅमर बसवण्याचा प्रयोग आयोगाने केला आहे.

* आता बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची प्रक्रियाही सुरु करण्यात आली. उमेदवाराचे आधार क्रमांक आणि त्यावरील बोटांचे ठसे यांच्या आधारे ही हजेरी घेण्यात येईल.

* उमेदवारांना आधार क्रमांक नोंदविणे सक्तीचे असल्याची सूचना आयोगाने यापूर्वीच दिली आहे. त्यासाठी आयोगाकडून विविध कंपन्यांकडून प्रस्तावही मागवण्यात आले आहेत.

* एकदम सर्व परीक्षांसाठी ही पद्धत लागू करण्यात येणार नाही. टप्प्याने एकेका परीक्षेला बायोमेट्रिक हजेरी लागू करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारानी आता आधार क्रमांक देणे अत्यावश्यक असते.

* परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी उमदेवराकडून बायोमेट्रिक हजेरी आणि परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसविण्याची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी काही परीक्षांसाठी मोबाईल जॅमर बसविण्याचा प्रयोग आयोगाने केला आहे. आता बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.