मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

राज्याच्या राज्याच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे - २७ फेब्रुवारी २०१८

राज्याच्या राज्याच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे - २७ फेब्रुवारी २०१८

* उसाकरिता ठिबक सिंचन, शेतकऱ्यांसाठी व्याजदर २%, जलयुक्त शिवाराअंतर्गत मे २०१८ पर्यंत १५ हजार गावे दुष्काळमुक्त. 

* आदिवासी क्षेत्रातील कुपोषण, नवजात बालमृत्यूदर कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम. बालमृत्यूदर २०१२ -१३ मधील प्रति हजारी २४ वरून २०१६ मध्ये १९ वर. 

* थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे आश्रमातील विद्यार्थ्यांना वस्तूखरेदी मुभा, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास प्रकल्पांतर्गत मोठ्या उद्योग गटाशी ८९ सामंजस्य करार. त्यातुन ९.८ लाख युवकांना कौशल्य, पुढील ३ वर्षात नोकऱ्या. 

* सिमेन्स, टाटा ट्रस्ट, बॉश, आदी औद्योगिक संघटना आणि व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामध्ये सामंजस्य करार ५० हजार रोजगार. 

* राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण ५२ हजार १४५ दुकानांमध्ये सेवा यंत्रे, १० जिल्ह्यात आधार संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्था. 

* मुंबई, पुणे, नागपूर महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये १ लाख कोटी अंदाजित खर्चाचे मेट्रो  प्रकल्प. नवी मुंबई विमानतळासाठी सर्व मंजुऱ्या प्राप्त एका धावपट्टीचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार, मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा १७ हजार ८४३ कोटी खर्चाचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रस्ता बांधणार. 

* सागरमाला कार्यक्रमांतर्गत विविध बंदरावर पायाभूत सोयी विकासासाठी २२२ कोटी खर्चाच्या ११ प्रकल्पाना मान्यता. नवीन भाऊंचा धक्का ते मांडवा बंदर रो रो फेरी सेवा सुरू. तसेच नेरुळ ते भाऊचा धक्का अशी प्रवास फेरी सुरु. 

* स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत २ हजार कोटी रुपयाचा निधी. १५.५ टक्के वाढीचा दर साध्य करण्यासाठी निर्मिती क्षेत्रात दरवर्षी ९.५ टक्के वाढ आवश्यक. 

* वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सरकारी सूतगिरण्यांना प्रति युनिट ३% दराने वीज अर्थसहाय्य अन्य वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सरकारी सूतगिरण्यांना प्रति युनिट ३ दराने अर्थसहाय्य. 

* जागतिक बँकेने व्यवसाय करण्याच्या सुलभतेच्या निकषावर आधारित केलेल्या सर्वेक्षणात भारताचा गुणानुक्रम १३० वरून १०० एवढा सुधारला तर व्यवसाय सुलभतेच्या १० निदर्शक तत्वांपैकी ९ निदर्शक तत्त्वावरील मुंबईचा क्रमांक दिल्लीपेक्षा खूप वर. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.