रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकारामुळे निधन - २५ फेब्रुवारी २०१८

अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकारामुळे निधन - २५ फेब्रुवारी २०१८

* अभिनय आणि नृत्याचं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं युएईमध्ये निधन झालं. कार्डियॅक अरेस्ट याच्यामुळे श्रीदेवी यांची प्राणज्योत मावळली.

* वयाच्या ५४ व्या वर्षी यांनी अकाली घेतलेली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांच्या पश्चात पती बोनी कपूर, मुली ख़ुशी आणि जान्हवी असा परिवार आहे.

* संयुक्त अरब अमिरातीतील दुबईपासून ४५ मिनिटावर असलेल्या रास अल खैमाममध्ये श्रीदेवी सहकुटुंब गेल्या होत्या. पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी कपूर कुटुंब तिथं गेलं होत.

* श्रीदेवी यांना बॉलिवूड पहिली लेडी सुपरस्टार मानलं जात श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, चित्रपटातही अभिनय केला आहे.

* वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी थूनैवन या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. १९७१ मध्ये वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी त्यांना पुम्बाता या मल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

* १९७५ मध्ये ज्युली या बॉलिवूडपटातून श्रीदेवी यांनी पदार्पण केलं. त्या चित्रपटात नायिका लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीची भूमिका श्रीदेवी यांनी रंगविली होती.

* वयाच्या १३ वर्षी [मुद्ररु मुदिच १९७६] हा श्रीदेवीनी केलेला तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला सिनेमा मानला जातो. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेला सोलवा सावन हा श्रीदेवी यांचा पहिला बॉलिवूडपट ठरला.

* श्रीदेवी यांच्या नावाचा खरा गवगवा झाला तो १९८३ साली प्रदर्शित झालेल्या हिम्मतवाला चित्रपटानं. जितेंद्र आणि श्रीदेवी जोडीनं मग मवाली, मकसद, जस्टीस चौधरी असे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले.

* कमल हसनच्या सोबतच्या सदमा या चित्रपटाच्या श्रीदेवी यांच्या अभिनयाला समीक्षाकडून कौतुकाची पावती मिळाली. मग चांदणी, लम्हे, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, नागिना, चालबाज, यासारख्या चित्रपटामधल्या भूमिकांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेत त्यांचं एक वेगळं वलय निर्माण झालं.

* श्रीदेवी यांनी ऐन भरात असताना मिथुन चक्रवर्ती याच्याशी केलेला विवाह अवघी तीन वर्षे टिकला, त्या दोघांनी १९८८ साली घटस्फोट घेतला. त्यानंतर श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्यात जवळीक निर्माण झाली.

* १९९६ साली त्या दोघानी लग्न केलं. हे बोनी कपूर यांच दुसरं लग्न. १९९७ मध्ये जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवीने जवळपास १५ वर्षाचा ब्रेक घेतला. त्यानंतर २०१२ मध्ये गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवीनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं.

* या चित्रपटातून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांनी मने जिंकली. २०१७ साली आलेला [मॉम] हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला.

* सांस्कृतीक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना २०१३ साली पदमश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्याच वर्षी श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली.

* रियल लाईफमधला दीर असणारा अनिल कपूर यांच्यासोबत त्यांनी साकारलेल्या अनेक चित्रपटांच्या भूमिका गाजल्या. श्रीदेवी यांच्या बहुतांश भूमिका गाजल्या. श्रीदेवी यांच्या बहुतांश यशस्वी चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे.

* दुर्दैवाची गोष्ट म्हणजे श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी करण जोहर दिग्दर्शित [धडक] चित्रपटातून पदार्पण करणार आहे. मात्र लेकीचा पहिला चित्रपट पाहण्यापूर्वीच त्यानी निरोप घेतला.

* श्रीदेवी यांचे काही महत्वाचे गाजलेले चित्रपट - [सदमा, हिम्मतवाला, जस्टीस चौधरी, मवाली, कलाकार १९८३], १९८४ तोहफा, १९८६ नगिना, १९८६ - आग और शोला, १९८६ - कर्मा, १९८६ - सुहागन, १९८७ - औलाद, १९८७ - मिस्टर इंडिया, १९८९ - निगाहे, चांदणी, चालबाज, १९९१ - फरिश्ते, लम्हे, १९९२ - खुदा गवाह, हिर रांझा, १९९३ - रूप की राणी चोरो का राजा, गुमराह, चंद्रमुखी. १९९४ - लाडला, १९९७ जुदाई, २०१२ - इंग्लिश विंग्लिश, २०१७ मॉम.

* १९९१ चा लम्हे व १९८९ चा चालबाज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.