सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

जगातील पहिल्या १५ श्रीमंत शहरामध्ये मुंबई १२ व्या स्थानावर - १२ फेब्रुवारी २०१८

जगातील पहिल्या १५ श्रीमंत शहरामध्ये मुंबई १२ व्या स्थानावर - १२ फेब्रुवारी २०१८

* जगातील टॉप १५ श्रीमंत शहरामध्ये देशाची आर्थिक राजधानी अर्थात मायानगरी मुंबईचा समावेश झाला आहे. मुंबईची संपत्ती ९५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून या यादीत अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर प्रथम स्थानावर आहे.

* न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला असून यात जगातील श्रीमंत शहर आणि अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत मुंबई १२ व्या स्थानी आहे.

* तर न्यूयॉर्कची संपत्ती सुमारे ३ ट्रिलियन डॉलर, लंडन [युके] - २.७ ट्रिलियन डॉलर, टोकियो [जपान] - २.५ ट्रिलियन डॉलर, सॅन फ्रान्सिस्को [कॅलिफोर्निया] - २.३ ट्रिलियन डॉलर, बीजिंग [चायना] - २ ट्रिलियन डॉलर,  लॉस एंजिल्स [कॅलिफोर्निया] - १.४ ट्रिलियन डॉलर, हाँगकाँग - १.३ ट्रिलियन डॉलर, सिडनी [ऑस्ट्रेलिया] १ ट्रिलियन डॉलर.

* सिंगापूर - १ ट्रिलियन डॉलर, शिकागो - ९८८ बिलियन  डॉलर, मुंबई [भारत] - ९५०बिलियन डॉलर, टोरांटो [कॅनडा] ९४४ बिलियन डॉलर, फ्रँकफर्ट [जर्मनी] - ९१२ बिलियन डॉल, पॅरिस [फ्रांस] - ८६० बिलियन डॉलर

* ही संपत्ती म्हणजे त्या त्या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची एकूण वैयक्तिक संपतती यामध्ये मालमत्ता, रोकड, इक्विटी यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. सरकारी निधी यातून वगळण्यात आला आहे.

* सर्वाधीक अब्जाधीश असलेल्या शहरांची यादी पाहता मुंबई टॉप १० मध्ये आहे. १ बिलियनपेक्षा जास्त संपत्ती २८ अब्जाधीश मुंबईत आहेत.

 * मुंबई एकूण संपत्ती ९५० बिलियन डॉलर एवढी आहे. हे शहर भारताची आर्थिक राजधानी आहे. जगातील १२ व्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टॉक एक्सेंज बॉंबेस्टॉक एक्सेंज बीएसई मुंबईत आहे.

* आर्थिक सेवा, रियल इस्टेट आणि मीडिया या मुंबईतील सर्वात मोठया इंडस्ट्रीज आहेत. असं अहवालात म्हटलं आहे.

* गेल्या १० वर्षात सॅन फ्रान्सिस्को, बीजींग, शांघाय, मुंबई आणि सिडनी या शहरांची संपत्ती गेल्या १० वर्षात वेगाने वाढली आहे. ह्युस्टन, जिनिव्हा, ओसाका, सेऊल, शेंगेन, मेलबर्न, झुरीच, दलास यांचा टॉप १५ च्या यादीत समावेश थोडक्यात हुकला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.