शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

कमल हसन यांचा 'एमएनएम' नवीन राजकीय पक्ष स्थापन - २३ फेब्रुवारी २०१८

कमल हसन यांचा 'एमएनएम' नवीन राजकीय पक्ष स्थापन - २३ फेब्रुवारी २०१८

* तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झालेले प्रख्यात अभिनेते कमल हसन यांनी [मक्कल निधी मय्यम - MNM] हा नवा राजकीय पक्ष स्थापन केल्याची घोषणा बुधवारी एका सभेत केली. 

* स्वातंत्र्यानंतर द्राविडी राजकारणाच्या बाहेर जाऊन नव्याने स्थापन झालेला हा पहिलाच पक्ष आहे. मक्कम निधी मय्यम या तामिळ नावाचा अर्थ, 'जनन्याय केंद्र' असा आहे. 

* सभेत कमल हसन यांनी पक्षाचा झेंडाही फडकविला आहे. सभेला उपस्थित असलेला प्रत्येक जण या नव्या पक्षाचा नेता आहे, आणि मी केवळ त्यांचे माध्यम आहे. असे सांगून कमल हसन यांनी पक्षाची ध्येयधोरणे लोकांचीच ठरवावीत असे आव्हाहन केले. 

* पक्षाचा झेंडा काळ्या आणि लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर एकमेकात वर्तुळाकार अडकविलेले ६ हात आणि त्या मधोमध तारा असा हा झेंडा आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.