बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

भारतात इंटरनेट वापरकर्त्यात मोठी वाढ - २१ फेब्रुवारी २०१८

भारतात इंटरनेट वापरकर्त्यात मोठी वाढ - २१ फेब्रुवारी २०१८

* इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या येत्या जून महिन्यापर्यंत पन्नास कोटीच्या घरात जाणार असल्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

* गेल्या वर्षी डिसेंबर २०१७ मध्ये भारतातील एकूण इंटरनेट वापरकर्ते ४८१ दशलक्ष म्हणजेच ४० कोटी ८१ लाखांच्या घरात असून डिसेंबर २०१६ च्या तुलनेत ११.३४ टक्के इंटरनेट वापरकर्ते वाढले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले.

* इंटरनेट व मोबाईल असोशिएशन ऑफ इंडिया व कन्टर आयएमआरबी यांनी संयुक्तपणे हा अहवाल तयार केला आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

* भारतात १८ कोटी ६० लाख ग्रामीण तर २९ कोटी ५ लाख शहरी इंटरनेट वापरकर्ते आहेत. ती वाढून येत्या जून महिन्यापर्यंत एकूण ५० कोटीपर्यंत पोहोचेल.

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.