बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

युरोपियन ऑब्झरर्व्हेटरीत स्वित्झर्लंड बर्न विद्यापीठाचे संशोधन - ८ फेब्रुवारी २०१८

युरोपियन ऑब्झरर्व्हेटरीत स्वित्झर्लंड बर्न विद्यापीठाचे संशोधन - ८ फेब्रुवारी २०१८

* पृथ्वीपासून ४० प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या ट्रॅपिस्ट १ या लाल ताऱ्याभोवती एकूण ७ पृथ्वीसदृश्य ग्रह सापडले असून तेथे जीवसृष्टीत आवश्यक असलेल्या पाणी हा घटक असण्याची दाट शक्यता आहे. असे या अभ्यासातून दिसून आले.

* आपल्या सौरमालेबाहेर जीवसृष्टी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वैज्ञानिकांचे मत आहे. ट्रॅपिस्ट १ ग्रहमाला गेल्यावर्षी २०१६ मध्ये सापडली असून त्याचे आणखी संशोधन करण्यात आले असता तेथे पृथ्वीसारखे ७ ग्रह सापडले आहेत.

* ते पृथ्वीइतक्या आकाराचे असून त्यांची नावे ट्रॅपिस्ट १ बी, सी, डी, इ, एफ व एच अशी आहेत. युरोपियन सदर्न ऑब्झरर्व्हेटरीत स्वित्झर्लंडच्या बर्न विद्यापीठाचे सिमॉन ग्रिम यांनी संगणकीय प्रारूपांच्या मदतीने हे संशोधन केले असून त्यात ग्रहाच्या घनताही ठरवल्या आहेत.

* या ग्रहावर पाणी असण्याची शक्यता बर्न विद्यापीठाचे ब्राईस ऑलीव्हिएर डेमोरी यांनी व्यक्त केली आहे. ट्रॅपिस्ट १ ग्रह एकमेकांच्या जवळ असून त्यांच्यात गुरुत्वाकर्षण आहे.

* ते ताऱ्यापासून जातात तेव्हा प्रकाश जातात तेव्हा प्रकाश वेगळ्या दिशेने वळतो. त्यावरून त्यांचा शोध घेतला आहे.

* त्या ग्रहांच्या घनतेच्या अंदाजानुसार ते खडकाळ नाहीत असा अंदाज आहे. तेथे लक्षणीय प्रमाणात पाणी असण्याची शक्यता आहे. काही ग्रहावर त्यांच्या वस्तुमानाच्या पाच टक्के पाणी असू शकते.

* पृथ्वीवर वस्तुमानाच्या केवळ ०.०२% पाणी आहे. ट्रॅपिस्ट १ डी हा हलका असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ३०% आहे. ट्रॅपिस्ट १ ई हा पृथ्वीपेक्षा जास्त घनता असलेला ग्रह असून त्याचा गाभा त्याचा गाभा लोहाचा असावा.

* ट्रॅपिस्ट १ इ हा इतर  ग्रहांपेक्षा जास्त खडकाळ आहे. ट्रॅपिस्ट १ एफ, जी, एच हे ताऱ्यापासून दूर असल्याने तेथे बर्फ असू शकतो. जस घनता असलेले पण ताऱ्याच्या जवळ नसलेले ग्रह यात आहेत. असे झुरिच विद्यापीठाच्या कॅरोलिन डॉर्न यांनी सांगितले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.