रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नरेंद्र मोदी यांचे हस्ते भूमिपूजन - १८ फेब्रुवारी २०१८

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नरेंद्र मोदी यांचे हस्ते भूमिपूजन - १८ फेब्रुवारी २०१८

* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नरेंद्र मोदी यांचे हस्ते भूमिपूजन १८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहतील.

* विमानतळाचे वैशिष्ट्ये

* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रूपाने विकासाच्या संधीचे नवे दालन खुले होणार असून  मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.

* हे विमानतळ नवी मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्राच्या आर्थिक विकासात मोलाची भर घालण्यात सहाय्यभूत ठरेल.

* ३,००० पात्र कुटुंबाचे नव्याने विकसित केलेल्या पुनर्वसन व पुनःस्थापना क्षेत्रात यशस्वीरित्या पुनर्वसन करण्यात येईल.

* या प्रकल्पामुळे व्यापार आणि रोजगार वृद्धी बरोबर मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपाच्या नोकऱ्याही उपलब्द होणार आहेत.

* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी वाहतूक क्षमता ६० दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष व माल वाहतूक क्षमता १.५ दशलख टन प्रति वर्ष इतकी असेल.

* या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पबाधितांसाठी विमानतळासाठी नजीकच्या क्षेत्रात ''पुष्पक नगर'' हा आधुनिक सोयीसुविधा सुसज्ज असलेला नोड विकसित करण्यात येत आहे.

* या विमानतळाचे काम मुंबईतील सिडको आणि जीव्हीके या कंपनीकडे देण्यात आले असून २०२२ पर्यंत हे विमानतळ सुरु करण्यात येईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.