मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०१८ - १३ फेब्रुवारी २०१८

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०१८ -  १३ फेब्रुवारी २०१८

* तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्रपती प्रलंबित असलेल्या छत्रपती पुरस्काराना सोमवारी अखेर सोमवारी अखेर मुहूर्त मिळाला. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ अशी तीन वर्षाच्या पुरस्कारांनी घोषणा केली.

* या पुरस्कारांमध्ये एकूण १९५ खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरविण्यात येणार आहे. येत्या शनिवारी गेट वे ऑफ इंडिया येथे पुरस्कार वितरण सोहळा राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.

* गेली ३ वर्षे राज्य क्रीडा पुरस्कार रखडले होते. नव्या सरकारने पुरस्काराच्या नियमावलीत बदल करून दरवेळेला होणारे वाद टाळण्यासाठी ऑनलाईन अर्ज आणि हरकती मांडणे अशा नव्या पद्धतीचा अवलंब केला.

* रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटर अजिंक्य राहणे, क्रिकेटर रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले.

* क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. गेल्या तीन वर्षाचे एकूण १९५ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

* २०१४-१५ साठी ऍथलेटिक्समध्ये रमेश तावडे, २०१५-१६ साठी मल्लखांब खेळातील अरुण दातार आणि २०१६-१७ साठी पॉवर आणि बॉडी बिल्डर क्रीडा प्रकारात विभीषण पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

* ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला.

* २०१४-२०१५ साठी ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. नुकतीच ७ महासागरे पोहून पार करत जागतिक विक्रम करणारा जलतरणपटू रोहन मोरे यालाही गौरविण्यात येणार आहे.

* पुरस्कारासाठी ७७६ अर्ज होते. यातून ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.