सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहाँगीर यांचे लाहोरमध्ये निधन - १२ फेब्रुवारी २०१८

मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहाँगीर यांचे लाहोरमध्ये निधन - १२ फेब्रुवारी २०१८

* पाकिस्तानातील ज्येष्ठ वकील व प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहाँगीर [वय ६६] यांचे आज लाहोरमध्ये निधन झाले. हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

* अस्मा यांच्या निधनामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अस्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

* मानवाधिकाराबाबत आग्रही असलेल्या अस्मा या स्पष्ट वक्त्या म्हणून प्रसिद्ध होत्या. मानवाधिकारासाठी काम करताना त्यांनी सर्व प्रकारचे दबाव झुगारून दिले.

* लोकशाही मूल्यांची जपवणूक करण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत काम केले. पाकिस्तानातील मानवाधिकार आयोगाच्या त्या सहसंस्थापक होत्या. या आयोगाच्या त्या सहसंस्थापक होत्या.

* या आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी तत्कालीन लष्करशहा झिया उल हक यांच्या विरोधातील आंदोलना वेळी अस्मा यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.