गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

पीएनबीतील नीरव मोदी महाघोटाळा प्रकरण - १६ फेब्रुवारी २०१८

पीएनबीतील नीरव मोदी महाघोटाळा प्रकरण - १६ फेब्रुवारी २०१८

* पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटी रुपयांचा घोटाळा घडवून आणणाऱ्या नीरव मोदी यांच्या मुंबई, दिल्ली आणि गुजरातमधील ठिकाणावर सीबीआय व अंमलबजावणी संचालनालय ईडी गुरुवारी धाडी टाकल्या.

* नीरव मोदी यांचा वडिलोपार्जित हिऱ्यांचा व्यापार आहे. आणि त्यांचे वडील बेल्जीयममध्ये स्थायिक झाले. नीरव मोदी यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला. त्यासाठी त्यांनी प्रियांका आणि आंतराष्ट्रीय अभिनेत्री यांच्याशी करार करण्यात आला.

* नीरवने आपला उद्योग वाढवण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि काही अधिकाऱ्याशी डावपेज साधून १७ बँकांमधून कर्ज काढण्यात आले. जवळपास ११ हजार कोटी रुपयाचे कर्ज काढण्यात आले.

* ईडीच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मोदी आणि अन्य आरोपींच्या मुंबईतील पाच संपत्ती सील करण्यात आल्या.

* याशिवाय बँक खात्यातील रक्कम आणि फिक्स डिपॉझीटची ३.९ कोटी रुपयांची रक्कमही सील करण्यात आली.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.