मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

चंद्राबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री - १३ फेब्रुवारी २०१८

चंद्राबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री - १३ फेब्रुवारी २०१८

* भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अव्वल स्थानी असून त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरले आहेत. 

* त्यांच्याकडे फक्त २६ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री आहेत. 

* देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून असोशिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स [एडीआर] या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

* त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरले आहेत. माणिक सरकार यांच्याकडे फक्त २६ लाख रुपयांची संपत्ती आहे. 

* तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे ३० लाख रुपये, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती सईद ५५ लाख, तर ५५% मुख्यमंत्र्यांची संपत्ती १ कोटी ते १० कोटी आहे. 

* सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असलेल्या यादीत चंद्राबाबू नायडू यांच्याकडे १७७ कोटी रुपयाची संपत्ती आहे. त्याखालोखाल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांचा समावेश आहे त्यांची संपत्ती १२९ कोटी एवढी आहे. 

* पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावावर ४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील २५ मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे एडीआरच्या पाहणीतून समोर आले आहे. 

* महाराष्ट्रातील मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे २२ दाखल आहेत. यात तीन गुन्ह्यांचा समावेश आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर ११ गुन्हे दाखल झालेले आहेत. 

* दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत. देशातील ३९ टक्के मुख्यमंत्री हे पदवीधर असून १६% मुख्यमंत्री हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री पी के चामलिंग यांच्याकडे डॉक्टरेट आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.