सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

पुण्याच्या विकास साठ्येला 'शॉटओव्हर के १ सिस्टीम' साठी पुरस्कार - १२ फेब्रुवारी २०१८

पुण्याच्या विकास साठ्येला 'शॉटओव्हर के १ सिस्टीम' साठी पुरस्कार - १२ फेब्रुवारी २०१८

* चित्रपटनिर्मितीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाच्या माध्यमातून नावीन्य आणणाऱ्या अभियंते आणि संशोधकांचा सन्मान ऑस्करच्या वतीने विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार देऊन करण्यात आला.

* यामध्ये विकास साठ्ये या मराठमोळ्या अभियंत्यांचा समावेश असून, त्यांना 'शॉटओव्हर के१ कॅमेरा सिस्टीम' साठी गौरविण्यात आले.

* साठ्ये यांच्यासह जॉन कॉयल, ब्रॅड हर्नडेल, शेन बुकहॅम यांना 'शॉटओव्हर के१ कॅमेरा सिस्टीम ची संकल्पना, रचना, अभियांत्रिकी आणि अंमलबजावणी यासाठी ऑस्करचा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार देण्यात आला.

* या कॅमेरा सिस्टीममध्ये सहा अक्षांचा वापर करून कॅमेरा ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे खाली सरळ रेषेत चित्रीकरण करता येणे शक्य होते.

* या तंत्रज्ञानाचा वापर 'डंकर्क, गार्डियन ऑफ गॅलक्सी -२, काँग:स्कल आयर्लंड आणि आगामी ज्युरॅसिक वर्ल्ड:फॉलन किंग्डम या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे. हवाई चित्रीकरणासाठी हे सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.