शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

भारत अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कप २०१८ चा विजेता - ३ फेब्रुवारी २०१८

भारत अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कप २०१८ चा विजेता - ३ फेब्रुवारी २०१८

* अंडर-१९ विश्वचषकावर भारताने चौथ्यांदा नाव कोरल आहे. ऑस्ट्रेलियाच्या २१७ धावाच आव्हान टीम इंडियानं अवघ्या ३८.५ षटकातच पूर्ण केलं.

* भारताच्या मनजोत कालराच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात कांगारूंवर तब्बल ८ गडी राखून मात केली.

* मनजोतन १०१ चेंडूत नाबाद १०२ धावा केल्या. भारताने याआधी २०००, २००८ व २०१२ साली अंडर १९ चा विश्वचषक जिंकला.

* कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोतन भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र पृथ्वी शॉ २९ धावांवर बाद होताच मनजोत कालराने संयमी खेळी करत टीम इंडियाच्या डावाला आकार दिला.

* उपांत्य सामन्यात शतक झळकविणारा शुबमन गिलने देखील मनजोतला चांगली साथ दिली. पण तो ३१ धावांवर परम उपलचा बळी ठरला.

* दरम्यान या अंतिम सामन्यात नाणेफेक जिकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलियाला २१६ धावाच करता आल्या.

* जोनाथन मेर्लोच्या ७६ धावांच्या झुंझार खेळी सोडल्यास इतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

* या सामन्यात संपूर्ण सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपलं वर्चस्व गाजवलं. भारताच्या ईशान पोरेल, कमलेश नागरगोटी, अनुकूल रॉय आणि शिवा सिंगनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.