गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८

जागतिक लोकशाही निर्देशांकात भारत ४२ व्या स्थानी - १ फेब्रुवारी २०१८

जागतिक लोकशाही निर्देशांकात भारत ४२ व्या स्थानी - १ फेब्रुवारी २०१८

* जागतिक लोकशाही निर्देशांकात भारत ४२ व्या स्थानी घसरण झाली आहे. प्रतिगामी धार्मिक विचारसरणीचा उदय आणि अल्पसंख्यांकविरोधातील वाढलेला हिंसाचार यामुळे भारताच्या स्थानात घसरण झाली आहे.

* जागतिक लोकशाही निर्देशांकात नॉर्वे प्रथम स्थानी कायम आहे. यामध्ये आइसलँड आणि स्वीडन दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

* इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट ने [ईआययू] हा वार्षिक निर्देशांक जाहीर केला आहे. गेल्या वर्षी भारताची ३२ व्या स्थानावरून घसरण होऊन तो ४२ व्या स्थानी आला आहे.

* भारतीय लोकशाहीचा समावेश सदोष लोकशाही गटामध्ये करण्यात आला आहे. भारतीय लोकशाही समावेश सदोष लोकशाही गटामध्ये सामील करण्यात आला.

* या निर्देशांकात १६७ देशांची पाहणी करण्यात आली. या निर्देशांकात देशांची विभागणी पूर्ण लोकशाही, संमिश्र लोकशाही आणि एकाधिकारशाही या चार गटात करण्यात आली आहे.

* जगातील लोकशाहीत आघाडीत पाच देश - नॉर्वे, आइसलँड, स्वीडन, न्यूझीलँड, डेन्मार्क हे देश आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.