मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

विशेष लेख - भारतीय बँकिंग व्यवस्थेचे भविष्यातील बदल - २७ फेब्रुवारी २०१८

विशेष लेख - भारतीय बँकिंग व्यवस्थेचे भविष्यातील बदल  - २७ फेब्रुवारी २०१८

* भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि ईकॉमर्सच्या क्षेत्रात येत्या काळात फार पुढे जाणार आहे. म्ह्णूनच भारतातील इंटरनेट आणि ईकॉमर्सच्या वापरकर्त्यांची वाढ वित्तीय तंत्रज्ञानाच्या वाढीस कारणीभूत होणार आहे.

* इन्फोसिस सहसंस्थापक आणि युआयडीचे माजी अध्यक्ष नंदन निलेकणी या टप्प्याला भारतीय वित्तीय सेवा क्षेत्राचा [व्हॉट्सऍप] क्षण असे नाव देतात. पुढच्या १० वर्षांमध्ये बँकिंग आजच्या तुलनेत एकदम निराळे असेल.

* बँकिंग विनाकागद होणार - भविष्यात बँकेत खाते उघडणे, विमा पॉलिसी, कर्ज, म्युच्युल फंड यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज लागणार नाही तुम्ही विनाकागद हे काम करू शकाल.

* आधार आणि बँकिंग मोबाईलचे महत्व वाढेल - भारतात आधार कार्ड किंवा मोबाईल फोन किंवा दोन्ही असलेल्या लोकांची संख्या एक अरबपेक्षा अधिक आहे.

* या दोन सेवा अशा ठिकाणी पोहोचतात जिथे बहुतांश शासकीय संस्था व्यवसायिक सेवा पोहोचत नाहीत. त्यामुळे यांचे बँकिंग आणि वित्तीय सेवांसाठी फार महत्व आहे.

* आधारच्या माहितीच्या गुप्ततेबद्दल काही शंका उपस्थित केल्या गेल्या असल्या तरीही वित्तीय सेवासाठी फार महत्व आहे. आधारच्या माहितीच्या गुप्ततेबद्दल काही शंका उपस्थित केल्या गेल्या असल्या तरीही वित्तीय सेवा देण्यासाठी याचे महत्व फार असणार आहे.

* बहुतांश भारतीय कुटुंब त्यांच्या स्मार्टफोनद्वारे इंटरनेटशी जोडले जातील आणि त्याचा खर्च उत्तरोत्तर कमी होत चालला आहे. याने शासकीय योजना आणि अशासकीय सेवा यांचा फायदा घेता येईल.

* ई-साइन, ई-केवायसी यांच्यात वाढ - खाते उघडण्याच्या प्रक्रियेत सर्वात मोठा अडथळा असतो अनेक कागदावर सही घेणे आणि कागदपत्रे गोळा करणे. ही एक खर्चिक प्रक्रिया आहे. आधारच्या युगात या प्रक्रिया डिजिटल करून वेळ आणि पैसा वाचविला जाऊ शकतो.

* कागदपत्रे दाखल करणे - अनेकदा एखादा कागद राहिला म्हणून प्रक्रियेला अडचणी येतात. मात्र भारत सरकारचा विनाकागद व्यवस्थेवर भर दिला जात असल्यामुळे हे कागदपत्रांची कामे सोपी होणार आहेत.

* डिजिलॉकरचा या उपकरणाने कागदपत्रे एकाच ठिकाणी सुरक्षित राहू शकतात. डिजिलॉकर खाते कोणालाही विनामूल्य उघडता येते.

* यात तुम्ही आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म प्रमाणपत्र आणि इतरही अनेक कागदपत्रे ठेवू शकता. यामुळे कागदपत्रे शेअर करणे सोपे होईल तसेच कागदपत्रांचा सांभाळ आणि प्रक्रिया यावर होणारा खर्च वाचेल.

* बचत करता येणे, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे आणि कुटुंबाचा विमा करणे यामुळे एका कुटुंबाची मिळकत १० टक्क्यापर्यंत वाढू शकते.

* विनाकागद बँकिंग आल्याने अधिक लोक बचत करू शकतील, कर्ज घेऊ शकतील आणि विमा उतरवून घेऊ शकतील, कारण त्यांना नोकरशाहीच्या फंदात पडण्याची गरज राहणार नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.