बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

भारतात ४ हजार १०० किमी मार्गावर धावणार बुलेट ट्रेन - १४ फेब्रुवारी २०१८

भारतात ४ हजार १०० किमी मार्गावर धावणार बुलेट ट्रेन - १४ फेब्रुवारी २०१८

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम यंदा जूनमध्ये सुरु होणार आहे.

* २०२२ मध्ये ती प्रवाशांच्या सेवेत येईल. मुंबई अहमदाबाद या ५०८ किमी मार्गावर बुलेट ट्रेन ताशी ३३० किमी वेगाने धावेल आणि अवघ्या २ तासात अंतर पार करेल.

* भारतात ४ हजार १०० किमी मार्गावर बुलेट ट्रेनचे प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मुंबई-पुणे, मुंबई-नागपूर, दिल्ली-कानपुर, दिल्ली-चेन्नई, चेन्नई-बंगळुरू-म्हैसूर, दिल्ली-चंदीगड, नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-बिलासपूर या मार्गाचा समावेश आहे.

* सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सर्व प्राथमिक चाचण्या रेल्वे मंडळाकडून घेण्यात येणार आहेत. त्या पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात जूनपासून काम सुरु करू, असे 'नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन' चे जनसंपर्क अधिकारी धनंजय कुमार यांनी सांगितले.

* भारताच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात ५४ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. त्यात ४ हजार पदे कायमस्वरूपी असतील. तर उर्वरित पदे कंत्राट व रेल्वेमार्फत भरली जाणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.