शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

MPSC चा पात्र उमदेवारीचा जारी केलेला निर्णय मागे - ६ जानेवारी २०१८

MPSC चा पात्र उमदेवारीचा जारी केलेला निर्णय मागे - ६ जानेवारी २०१८

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षांमध्ये पूर्वपरीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराचे प्रमाण आता घटणार असून आता उपलब्द जगाच्या बारापट उमेदवार पात्र ठरणार  आहेत.

* एकत्र झालेल्या परीक्षा आणि अनेक जागांवर पुरेसे उमेदवार मिळत नसल्यामुळे यापूर्वी मुख्य परीक्षेसाठी अधिक उमेदवार पात्र ठरवण्याचा काही महिन्यापूर्वी आयोगाने जाहीर केलेला निर्णय मागे घेतला आहे.

* एमपीएसीच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा तीन टप्प्यामध्ये होतात. या परीक्षेसाठी असलेल्या जागांच्या प्रमाणात मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण आता घटणार आहे.

* यापूर्वी पूर्व परीक्षेतून जागांच्या १२ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येत होते. मात्र अधिक उमेदवारांना संधी मिळावी यादृष्टीने सप्टेंबर २०१७ मध्ये उमेदवारांचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय आयोगाने घेतला.

* मुख्य परीक्षेसाठी उपलब्द पदांच्या १५ ते १६ उमेदवार पात्र ठरविण्यात येतील. असे परिपत्रक आयोगाने काढले. मात्र आता पुन्हा हे प्रमाण कमी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

* यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी यापुढे उपलब्द जागांच्या १२ पट उमेदवार परीक्षेसाठी निवडण्यात येतील. जागांच्या १२ पट उमेदवार निवडून किमान गुणांची सीमारेषा [कट ऑफ गुण] निश्चित करण्यात येईल.

* त्यानंतर प्रत्येक प्रवर्गासाठी असलेल्या जागांच्या बारापट उमेदवार पात्र ठरले आहेत का याचा आढावा घेऊन आवश्यक त्या गटासाठी गुणांची सीमारेषा कमी करण्यात येणार आहे.

* त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या एकूण उमेदवारांचे प्रमाण कमी होणार असले तरीही प्रत्येक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळू शकणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.