शनिवार, ६ जानेवारी, २०१८

२०१७-१८ मध्ये भारताचा GDP ६.५% राहण्याचा अंदाज - ६ जानेवारी २०१७

२०१७-१८ मध्ये भारताचा GDP ६.५% राहण्याचा अंदाज - ६ जानेवारी २०१७

* एकूण देशांतर्गत उत्पन्नामध्ये जीडीपी २०१७-१८ या वर्षातील वाढ ६.५% राहील. असा अंदाज केंद्रीय संख्याशास्त्र व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आज जाहीर केले.

* २०१६-१७ मध्ये हा वाढीचा दर ७.१% होता. म्हणजेच यंदा त्यात अर्ध्या टक्क्याहून अधिक घट नोंदली जाणे अपेक्षित आहे.

* कृषी व संलग्नक्षेत्राच्या वाढीचा दर २.१% राहील असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दरही कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत औद्योगिक उत्पादन देखील घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

* संख्याशास्त्र मंत्रालयाने २०१७-१८ मधील राष्ट्रीय प्राप्ती विषयक प्राथमिक अंदाजाची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये हे तपशील देण्यात आले आहेत.

* एकूण मूल्यवर्धित किंवा ग्रॉस व्हॅलू ऍडेड जीव्हीए म्हणजेच औद्योगिक क्षेत्राद्वारे उत्पन्न झालेल्या वस्तू व सेवा यांच्या मापनाच्या पद्धतीनुसार यामध्ये देखील १११.८५ लाख कोटी रुपयांवरून ११८.७१ लाख कोटी वाढ होणे अपेक्षित आहे.

* कृषी, वनसंपदा, मत्स्यव्यवसाय यामध्ये २.१% वाढीची शक्यता आहे. गेल्या वर्षी या क्षेत्राने ४.९% वाढ नोंदविली होती. देशातील धान्योत्पादन घट होण्याची शक्यता आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.