सोमवार, १ जानेवारी, २०१८

रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद विदर्भ संघाकडे - १ डिसेंबर २०१७

रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद विदर्भ संघाकडे - १ डिसेंबर २०१७

* आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच रणजी सामन्याची अंतिम फेरी गाठणाऱ्या विदर्भाने आज इंदूरच्या होळकर मैदानावर विक्रमाची नोंद केली. रणजी करंडक अंतिम फेरीत विदर्भाने दिल्लीवर ९ गडी राखून मात केली.

* दुसऱ्या डावात विदर्भासमोर विजयासाठी अवघ्या २९ धावांच आव्हान होत. हे आव्हान विदर्भाने पार केलं. दुसऱ्या डावात ध्रुव शौरी आणि नितीश राणा तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत विदर्भाचा विजय लांबविण्याचा प्रयत्न केला.

* यंदाच्या हंगामात विदर्भाच्या संघाने केलेली कामगिरी ही नक्कीच चांगली होती. पहिल्या सामन्यात विदर्भाने पंजाबवर एक डाव आणि ११७ धावांनी विजय मिळवला.

* मागच्या वर्षी गुजरातने रणजी करंडक स्पर्धा जिंकली होती. विदर्भ संघाने उपांत्यपूर्व फेरीत विदर्भाने केरळला तर उपांत्य सामन्यात कर्नाटकचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

* दिल्लीने आतापर्यंत ७ वेळा रणजी करंडकच विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होईल. असा सर्वानी अंदाज व्यक्त केला होता.

* मात्र चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने अंदाज व्यक्त केला होता. मात्र चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सर्वांचे अंदाज खोटे ठरवत आपलं पहिलं वहिलं रणजी विजेतेपद पटकावलं.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.