शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

तीन राज्यात फेब्रुवारीत विधानसभा निवडणूका - १९ जानेवारी २०१८

तीन राज्यात फेब्रुवारीत विधानसभा निवडणूका - १९ जानेवारी २०१८

* त्रिपुरा, मेघालय, आणि नागालँड या तीन राज्याच्या विधानसभेसाठी निवडणुकीच्या तारखा निवडणूकाच्या तारखा निवडणूक आयोगाने घोषित केल्या आहेत.

* त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारी रोजी, तर नागालॅंड आणि मेघालयमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहेत. या तिन्ही राज्यामधील मतमोजणी तीन मार्च रोजी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी सांगितले.

* मुख्य निवडणूक आयुक्त ज्योती यांनी परिषद घेऊन या तिन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.

* या तिन्ही राज्यामधील मतमोजणी ३ मार्च रोजी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती  सांगितले. या तिन्ही राज्यातील विधानसभेची सदस्यसंख्या प्रत्येकी ६० आहे.

* मेघालय विधानसभेचा कार्यकाळ ६ मार्च रोजी, तर नागालँडच्या विधानसभेचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपुष्टात येत आहेत. या तिन्ही राज्यात सत्तेवर येण्यासाठी भाजप प्रयन्तशील असून, काँग्रेस आणि डावे पक्ष त्यांची राज्ये राखण्याचा प्रयत्नात आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.