रविवार, १४ जानेवारी, २०१८

देशातील सर्व रेल्वेस्थानकामध्ये वायफाय सुविधा - ७ जानेवारी २०१८

देशातील सर्व रेल्वेस्थानकामध्ये वायफाय सुविधा - ७ जानेवारी २०१८

* देशातील सर्व रेल्वेस्थानकामध्ये वायफाय सुविधा उपलब्द करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या योजनेसाठी ७०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

* डिजिटल इंडिया या सरकारच्या महत्वाकांशी उपक्रमांतर्गत रेल्वे खात्याने अलीकडेच २१६ महत्वाच्या स्थानकावर वाय फाय सेवा उपलब्द करून दिली.

* त्यामुळे या रेल्वे स्थानकातील मोफत इंटरनेट सेवेचा सुमारे ७० लाख प्रवाशांना लाभ मिळत आहे. देशातील ग्रामीण दुर्गम व शहरी भागातील सर्व म्हणजे ८५०० रेल्वेस्थानकावर वायफाय सुविधा उपलब्द करून देण्याचे उद्दिष्ट मार्च २०१९ पर्यंत उपलब्द करून देण्यात येईल.

* त्यामुळे आगामी २०१९ च्या लोकसभा निवडुकामध्ये वायफाय सुविधा उद्दिष्ट पूर्तीसाठी मुद्दा भाजपासाठी प्रचारात वापरला जाऊ शकतो.

* ग्रामीण भागामध्ये डिजिटल बँकिंग, आधारकार्ड, तयार करणे, सरकारी प्रमाणपत्रे, जन्ममृत्यू प्रमाणपत्रे, करभरणा, बिले भरणे, या सर्व गोष्टीसाठी इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर जनतेकडून व्हावा असे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.