बुधवार, १७ जानेवारी, २०१८

ज्येष्ठ भाजप नेते प्रा. फरांदे यांचे निधन - १७ जानेवारी २०१८

ज्येष्ठ भाजप नेते प्रा. फरांदे यांचे निधन - १७ जानेवारी २०१८

* विधानपरिषदेचे माजी सभापती, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण सदाशिव तथा प्रा ना. स फरांदे यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.

* जन्मभूमी सातारा जिल्ह्यातील असली, तरी प्रा फरांदे यांची कर्मभूमी नगर जिल्हाच राहिली. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळविल्यानंतर त्यांनी नगर, धुळे, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यात भाजपचे काम केले.

* पक्ष भाजप असला तरी विविध पक्षातील प्रमुख नेत्यांसमवेत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. विधानपरिषदेत त्यांनी विविध प्रश्नावर केलेली भाषणेही गाजली.

* कालांतराने त्यांनी विधानपरिषदेचे सुरवातीला उपसभापतिपद व नंतर सभापतिपद सांभाळले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.