शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कार - २७ जानेवारी २०१८

ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कार - २७ जानेवारी २०१८

* असामान्य शौर्यबद्दल हवाई दलाचे कमांडो कॉर्पोरल ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर करण्यात आले . शांततेच्या काळात दिला जाणार हा सर्वोच्च शौर्य सन्मान आहे.

* जम्मू काश्मीर लाईट इन्फ्रंटीच्या चौथ्या बटालियनचे मेजर वीजयंत बिश्त यांना कीर्तीचक्र जाहीर झाला आहे. राष्ट्रीय रायफल्सचे सार्जंट मिलिंद किशोर खैरनार यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर झाले आहेत.

* राष्ट्रीय रायफल्सचे सार्जंट मिलिंद किशोर खैरनार यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर झाले आहे. जम्मू काश्मीरच्या बांदीपूरा भागात दहशतवाद्याबरोबर लढताना खैरनार यांना वीरमरण आले.

* परमविशिष्ट सेवापदक विजेत्यांत व्हाईस ऍडमिरल ए. आर. कर्वे, अतिविशिष्ट सेवा पदक विजेत्यांत जनरल माधुरी कानिटकर, सर्जन व्हाईस ऍडमिरल ए ए पवार, एअर कोमोडोर कार्तिकेय काळे, एअर व्हाईस मार्शल सुनील जयंत नानोदर[निवृत्त], युद्धसेवा पदक विजेत्यांत ब्रिगेडियर अभिजित सुरेंद्र पेंढारकर आणि सेनपदक शौर्य विजेत्यात लेफ्टनंट कर्नल प्रवीण माधव खानझोडे, कॅप्टन कौस्तुभ प्रकाशकुमार राणे. यांना प्रदान करण्यात आला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.