सोमवार, १ जानेवारी, २०१८

यावर्षी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा 'शिव राज्याभिषेक' चित्ररथ सादर होणार - १ जानेवारी २०१८

यावर्षी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा 'शिव राज्याभिषेक' चित्ररथ सादर होणार - १ जानेवारी २०१८

* राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचालनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'शिवराज्याभिषेक' आधारित चित्ररथ सादर करण्यात येणार आहे.

* चित्ररथ बांधणीसाठी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमू दिल्लीत दाखल झाली आहे. यावर्षी ६९ वा प्रजासत्ताक दिनी इंडिया गेटवरील राजपथावर महाराष्ट्रसह १४ राज्यांचे चित्ररथ सादर होणार आहे.

* यावर्षी देशभरातून एकूण २९ राज्यांनी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती. विविध चाचण्यांवर महाराष्ट्रासह देशातील फक्त १४ राज्यांच्या चित्ररथाची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे.

* महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे.

* यापूर्वी १९८० मध्येही राज्याच्या शिवराज्यभिषेक दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शित केला होता. यास प्रथम पारितोषिक मिळालं होत. १९८३ मध्ये बैल पोळा या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता.

* यानंतर १९९३ ते १९९५ असा सलग ३ वर्षे प्रथम क्रमांक मिळण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला होता. २०१५ मध्ये प्रदर्शित 'पंढरीची वारी' या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला हा उल्लेखनीय बाब आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.