बुधवार, २४ जानेवारी, २०१८

काही विशेष नवीन चालू घडामोडी - २४ जानेवारी २०१८

काही विशेष नवीन चालू घडामोडी - २४ जानेवारी २०१८

* लायबेरियाचे माजी फुटबॉलपटू जॉर्ज विआ यांची लायबेरिया देशाचे राष्ट्रध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. २००२ नंतर फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर जॉर्ज विआ राजकारणात सक्रिय झाले होते. 

* पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चंडी लाहिरी यांचे १८ जानेवारी रोजी निधन झाले. मिशके, नेगटी, बिदेशीदर चोखे बांगला, चंडिर, चंडीपथ, बांगलाकर कार्टून इतिहास ही त्यांची बंगाली ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. 

* स्वित्झर्लंड दावोस येथे २२ जानेवारीपासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ४८ व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली. 

* १००% सेंद्रिय कृषी उत्पादने पिकविणारे सिक्कीम देशातील पहिले राज्य ठरले आहे. २००३ पासून सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी विधानसभेत राज्यातील संपूर्ण शेती सेंद्रिय करण्याची घोषणा केली होती. 

* राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवत ५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

* मोदींच्या काळात भारताची अधोगती झाली असा निष्कर्ष गँलप पाहणी अहवालात नमूद करण्यात आला आहे. 

* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचे सदस्यत्व रद्द करत त्यांना अपात्र ठरवले आहे. 

* होमिओपॅथी वैज्ञानिक संशोधन चालविण्यासाठी राजस्थानच्या जयपूरमध्ये केंद्रीय संशोधन संस्थेची कोणशीला ठेवली गेली आहे. AYUSH मंत्रालयानांतर्गत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद [CCRH] अखत्यारीस ही तिसरी केंद्रीय संशोधन संस्था आहे. अशा देशभरात २३ संस्था स्थापन केल्या जाणार आहेत.

* चीन वर्ष २०२२ पर्यंत पूर्वेकडील झेजियांग प्रांतात १६१ किलोमीटर लांबीचा सहा पदरी [इंटेलिजंट एक्सप्रेसवे] तयार करण्याची योजना आखत आहे.

* जुन्नरजवळील माळशेज घाटातील निसर्ग सौन्दर्याची भुरळ फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातील पर्यटकांना पडली आहे. माळशेजचे हे सौन्दर्य आता जगाच्या नकाशावर आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. लवकरच माळशेज घाटात देशातला पहिला पारदर्शक पूल [वॉक वे] बांधण्यात येणार आहे.

* केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये प्रथम [आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षितता परिषद] आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत मोठ्या धरणांच्या सुरक्षेतेसंबंधी विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली. परिषदेत २० हून अधिक देशातून ५५० प्रतिनिधी सहभाग घेतला.

* बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला दावोसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक मंच [WEF] बैठकीत क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

* भारतीय महिला संघाची अष्टपैलु खेळाडू हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाकडे नेतृत्व सोपविण्यात आलेले आहे.

* इथियोपियाचा लांब पल्ल्याच्या धावक सोलोमन डेकसिसा याने १५ व्या [मुंबई मॅरेथॉन] स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपद पटकावले आहे.

* लखनऊ मध्ये चौथ्या भारतीय आंतराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे [IISF] आयोजित करण्याचे सुनिश्चित केले गेले आहे. २०१५ साली IIT दिल्ली प्रथम भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव [IISF] आयोजित करण्यात आले होते.

* अंधांच्या विश्वचषक २०१८ यास्पर्धेत भारताने २० जानेवारी रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.