रविवार, १४ जानेवारी, २०१८

भारताचे अणुवैज्ञानिक प्रा बलदेव राज यांचे निधन - ८ जानेवारी २०१८

भारताचे अणुवैज्ञानिक प्रा बलदेव राज यांचे निधन - ८ जानेवारी २०१८

* भारताचे अणुवैज्ञानिक बलदेव राज त्यांचे ६ जानेवारी रोजी पुणे येथे एका परिषदेसाठी आले असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

* त्यांचा जन्म काश्मीरमध्ये झाला पण नंतर ते बंगलोरला स्थायिक झाले. रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठातून त्यांनी पदवी व नंतर बंगलोरच्या आयआयएसी या संस्थेतुन पीएचडी केली.

* त्यांचे बहुतांश संशोधन अणुक्षेत्रात असले तरी पदार्थ विज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान व विज्ञानविषयक धोरणे यावरही त्यांनी बरेच काम होते. वैज्ञानिक राजनय व वैज्ञानिक धोरण यात त्यांनी सरकारला मोठी मदत केली.

* अणुशक्ती विभागात ते ४५ वर्षे कार्यरत होते. त्यांनी एकूण ८० पुस्तके, १३०० शोधनिबंध व १०० लेख लिहिले आहेत. सध्याच्या काळात ऊर्जा, पाणी, आरोग्य सुविधा, उत्पादनक्षमतेत वाढ अशा बहुअंगी आव्हानांचा वेध त्यांच्या संशोधनाने घेतला.

* सोडियम फास्ट रिऍक्टर्स व त्याच्याशी संबंधित इंधनचक्र याचे संशोधन त्यांनी केले. तसेच वेल्डिंग करोजन, फेरोफ्लूएड्स व सेन्सर्स हेदेखील त्याचे संशोधनाचे विषय होते.

* कल्पक्कम येथील इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटोमिक रिसर्च या संस्थेत त्यांनी काम केले होते. सध्या ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज या संस्थेचे संचालक होते.

* इंटरनॅशनल न्यूक्लिअर एनर्जी ऍकॅडमी इंटरनॅशनल अमेरिकन सोसायटी ऑफ मेटल्स, इंडियन इन्स्टिट्यूट अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले.

* त्यांना पदमश्री, होमी भाभा सुवर्णपदक, एच के फिरोदिया पुरस्कार, ओमप्रकाश भसीन पुरस्कार, वासविक पुरस्कार, इंडियन न्यूक्लिअर सोसायटीचा जीवनगौरव, गुजरमल मोदी पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.