शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

आर्थिक विकासात देशात महाराष्ट्र अव्व्ल - २० जानेवारी २०१८

आर्थिक विकासात देशात महाराष्ट्र अव्व्ल - २० जानेवारी २०१८

* सर्वंकष आर्थिक विकासात देशात अग्रेसर राज्याच्या मान महाराष्ट्राने मिळविला आहे. 'ग्रोथ इनोव्हेशन लीडरशिप इंडेक्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया' याबाबत 'फ्रोस्ट सॉलीव्हॅन' या जागतिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनातून महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला.

* देशातील २९ राज्यांचे १०० निर्देशकांच्या माध्यमातून संशोधन करण्यात आले. 'फ्रोस्ट सॉलीव्हॅन' संस्थेचे जागतिक अध्यक्ष अरुप झुत्सी यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला.

* या संशोधनाच्या माध्यमातून देशातील २९ राज्याचा आर्थिक विकास या संबंधी संशोधन करण्यात आले. त्यासाठी प्रमुख दहा मापदंडाच्या आधारे करण्यात आले असून त्यात संगणीकरण, आर्थिक समृद्धी, शैक्षणिक कौशल्य, प्रशासनातील परिणामकारकता, गुंतवणूक क्षमता, महिला सबलीकरण, पायाभूत विकास, रोजगार कार्यक्षमता, आरोग्य सुधारणा आणि दळणवळणाच्या सुविधा या निकषाच्या आधारे अभ्यास करून सर्वंकष आर्थिक विकासात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे.

* एखाद्या राज्याचा आर्थिक विकास हा विकासदर वाढीबरोबर शिक्षण, रोजगार क्षमता या बाबीशी देखील निगडित असतो आणि याच निकषाच्या आधारावर फ्रोस्ट सॉलीव्हॅन संस्थेमार्फत देशातील विकसित राज्याची निवड केली जाते.

* या सर्व निकषाच्या परिमाणात महाराष्ट्राने २९ राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवीत देशात अग्रेसर राहण्याचा मान राखला आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.