रविवार, २८ जानेवारी, २०१८

दिव्यांगांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ४% आरक्षण - २९ जानेवारी २०१८

दिव्यांगांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ४% आरक्षण - २९ जानेवारी २०१८

* आत्मकेंद्रीपणा [ऑटिझम], मनोरुग्ण, बौद्धिक दुर्बलता, आणि ऍसिड हल्ल्याने बाधित झालेल्या व्यक्तींना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

* 'अ', 'ब', 'क', श्रेणीतील थेट भरतीच्या पदापैकी ४% जागा विवक्षित प्रमाणात अपंगत्व [बेंचमार्क  डिसेबिलिटी ] असलेल्या दिव्यांगांसाठी राखून ठेवल्या जाणार आहेत. ठराविक प्रकारच्या ४०% किंवा त्याहून अधिक अपंगत्व [बेंचमार्क डिसेबिलिटी] म्हटले जाते.

* केंद्र सरकारच्या सर्व खात्यामध्ये अंध व अधूदृष्टी, कर्णबधिर, सेलेब्रल, पाल्सीसह अवयव व्यंगता असलेले, स्नायूंचा शक्तिपात झालेले, खुजेपणाने उंची खुंटलेले आणि ऍसिडहल्ल्याने बाधित झालेले अशा लोकांनी प्रत्येकी १ टक्का जागा राखून ठेवण्यात येणार आहेत.

* तसेच ऑटिझम, बौद्धिक दुर्बलता, शिक्षणात मंद असलेले व मनोरुग्ण यांच्यासाठी हे १ टक्का आरक्षण लागू असेल. या आधी सन २००५ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार दिव्यांगांसाठी ३ टक्के आरक्षण होते.

* २०१६ साली नवा दिव्यांग हक्क कायदा संमत झाल्यानंतर हे आरक्षण १ टक्क्याने वाढविण्यात आले आहे. या जागांवर फक्त याच प्रवर्गातील व्यक्ती नेमल्या जाव्यात आणि त्या जागा रिकाम्या असतील, तर त्यावर अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तींची नेमणूक न करण्याची तरतूदही नव्या नियमामध्ये करण्यात आली आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.